Distribution of School Bags
मोफत शालेय साहित्य व स्कूल बॅग वाटप
सामजिक क्षेत्रात तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या ग्राम स्वराज्य फाऊंडेशन,पुणे यांचे कार्य नेहमीच उल्लेखनीय असते.मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गारोळ्याची वाडी प्राथमिक शाळेतील मुलांसाठी काही करण्याच्या इच्छेतून आणि शालेय विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वर्षभर पुरतील एवढ्या शालेय साहित्य व स्कूल बॅग चे वाटप करण्याचा कार्यक्रम दिनांक 11/09/2018 वार मंगळवार या दिवशी ठीक सकाळी 11:00 वाजता आयोजित केला आहे.
तसेच गावामध्ये *स्थलांतरित कुटुंबाचे* प्रमाण जास्त आहे;परंतु मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आणि आमच्या विनंतीला मान देऊन गावकरी मुलांना गावामध्ये ठेवतात.अशा मुलांच्या काही *शैक्षणिक गरजा* असतील त्या शिक्षक सोडविण्याचा प्रयत्न करतात. तसेच आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी “डॉ.सुरेश जाधव* यांचे *रयत फाऊंडेशन* काम करणार आहे. फाऊंडेशन मार्फत गरजू मुलांना *मोफत उपचार* करण्याचे पवित्र काम डॉ. सुरेश जाधव करणार आहेत.अशा या महत्त्वपूर्ण समाजोपयोगी कार्यक्रमाप्रसंगी खालील सन्माननीय उपस्थित राहणार आहेत.
1)ग्राम स्वराज्य फाऊंडेशन टीम
2)रयत फाऊंडेशन
⭐1) मा.श्री.राजेश पातळे(गटशिक्षणाधिकारी, कळमनुरी)
⭐2)मा.श्री.बालाजी गोरे(विस्तार अधिकारी, बीट कळमनुरी)
⭐3)मा.श्री.डॉ.सुरेश जाधव(जिजाऊ हॉस्पिटल,सिरसम बु.)
⭐4)मा.श्री.गुलाबराव घुमनर(केंद्रप्रमुख,केंद्र भाटेगाव व खरवड)
⭐5)मा.श्री. घुगे आर.बी(ग्रामसेवक,गारोळ्याची वाडी)
⭐6)मा.श्री.नंदकुमार ढोके (प्रा.शिक्षक)
*कार्यक्रमाचे आयोजक*