Hiware Bazar Visit

परवाच्या 24 तारखेला  हिवरे बाजारला जाणं झालं. इतके दिवस ज्या गावाबद्दल ऐकलं, वाचलं व टीव्ही वर पाहिलं होतं, ते प्रत्येक्षात पाहिलं.
 
भारावून गेलो. हिवरे बाजार गाव कायमचं मनात कोरले गेलंय.
 
1) हिवरे बाजारातील सिमेंट रस्ते पाहिल्यावर आपल्याकडील सिमेंट रस्ते करणाऱ्याला बुटाने मारावे वाटतंय.
 
2) ‎गावातील लोकांना गावाबद्दल व सरपंच पोपटराव पवार यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे.आपल्याकडील सरपंच प्रामुख्याने पैसे देऊन झालेले असतात, त्यांना व पैसे घेऊन मतदान करणार्यांना गावाबद्दल कसलीही तळमळ नसते.काही अपवाद आहेत.
 
3) ‎गावात कमालीची स्वच्छता आहे.त्यासाठी कोणताही कर्मचारी नेमलेला नाही.लोकं स्वयंप्रेरणेने कचरा उचलून जागोजागी ठेवलेल्या कचराकुंडीत टाकतात.आपल्याकडं जागोजागी कचऱ्याचे ढीग असतात.पाणी रस्त्यावर वाहते, नाल्या तुंबलेल्या असतात.
 
4) ‎गावातील सर्वच लहानथोर श्रमदान करायला नेहमी तय्यारच असतात. आपल्याकडं आनंदीआनंद.
 
5) ‎त्या गावातील शाळा, ग्रामपंचायतचे कार्यालय, मंगल कार्यालय, मंदिर तसेच पाण्यासाठी या गावाने केलेले काम पाहिलं की आपण थक्क होतो.
 
6) ‎या ठिकाणचे नियम सर्व गावकरी पाळतात.त्यांची एकी व पोपटराव पवारांचे नेतृत्व त्यांच्या प्रगतीचे कारण आहे.
 
आपल्याकडे असं होऊ शकते.सर्वांना निस्वार्थ पणे एकत्र यावे लागेल. श्रमदानातून सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात, अस वाटतं. एकदा हिवरे बाजार सर्वांनी पाहायला हवे.
 
 
Sopan Chandale
GramSwaraj Foundation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *