Donations needed for schools in rural area

मित्रांनो, आपण कायमच आपल्या समाज बांधवासांठी ग्राम स्वराज फाऊंडेशन च्या सोबत उभे राहिले आहात.आपण आतापर्यंत ग्रामीण भागात पाण्याबाबत आणि शेक्षणीक कामे केली आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मधील गरीब मुलांसाठी व त्यांना (शेक्षणिक)प्रगत करण्यासाठी आपण एक उपक्रम हातात घेतला आहे. ग्रामीण भागातील मुलांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना योग्य ते साहित्य उपलब्ध होत नाही , तर या साठी आपण प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपल्या सोबत जिल्हा प्रशिक्षण केंद्र , जि. हिंगोली यांचा ही भरीव सहभाग असणार आहे.

यामध्ये मुलांसाठी स्वाध्यायमाला/ व्यवसायमाला तयार करून त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊन त्यांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वाध्ययमालेतील प्रश्न हे ज्ञानरचनावादा तील काही निकषांवर अवलंबून व ग्रामीण भागातील परिसराला अनुसरूनच असतील. हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील काही तज्ञ शिक्षक व जिल्हा प्रशिक्षण केंद्र , हिंगोली मधील तज्ञ शिक्षकवृंद प्रश्न तयार करणार आहेत. आपला हा प्रयत्न महाराष्ट्रातील पहिलाच प्रयत्न असणार आहे. आणि याचा फायदा जवळपास १६ शाळातील १००० च्या वर मुलांना होणार आहे.

मुलांची गुणवत्ता बघून आपण हा प्रयोग रिझल्ट सहित महाराष्ट्र शासनाला कळवणार आहोत. आणि जर शासनाने मनावर घेतलं तर हाच प्रयोग पूर्ण महाराष्ट्रात राबवू शकतात. 

या सर्वासाठी आपल्याला ४०,००० रुपये खर्च अपेक्षित आहे. तेव्हा मी ग्राम स्वराज फाऊंडेशन तर्फे आपणांस विनंती करतो की आपणास शक्य असेल तेवढी मदत करावी.

Donation Details on : http://www.gramswarajfoundation.org/donate/

आपला,
विशाल चंदाले/ ग्राम स्वराज फाऊंडेशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *